त्रिपुरातील दुर्मिळ कासवे नामशेष होण्याच्या मार्गावर

त्रिपुराच्या गोमती जिह्यातील त्रिपुरेश्वरी मंदिराभोवती असलेल्या तलावात बोस्तामी कासवांची दुर्मिळ प्रजाती आहे. ही प्रजाती आता नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाने सांगितले आहे. राज्य सरकारने टर्टल सर्व्हायव्हल अलायन्स फाऊंडेशनद्वारे बोस्तामी कासवांवर वर्षभर चालणाऱ्या अभ्यासासाठी निधी मंजूर केला आहे. उत्तर प्रदेशातील टर्टल सर्व्हायव्हल अलायन्स फाऊंडेशन या संस्थेकडून सध्याची बोस्तामी कासवांची संख्या आणि त्यांच्या समस्या यावर व्यापक अभ्यास केला जाईल. साधारणपणे पावसाळ्याच्या सुरुवातीनंतर अंडी उबवण्याचे काम होते. या कासवांचा वैज्ञानिक अभ्यासाच्या अभावामुळे अचूक डेटा नाही असे जिल्हा वन अधिकारी एच. विघ्नेश यांनी सांगितले.