ट्रॉम्बेत घराच्या बाल्कनीचा भाग कोसळून मुलाचा मृत्यू, दोघे जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ट्रॉम्बे चिता कॅम्प येथील दोन मजली घराच्या बाल्कनीचा भाग कोसळून चार वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली. प्रणव माने असे या मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले आहेत.

ट्रॉम्बे चिता पॅम्प, दत्ता नगर झोपडपट्टीतील घराच्या बाल्कनीचा भाग शनिवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत प्रणव माने (4) याचा मृत्यू झाला तर प्रिन्स कोलजी ( 8) व जाफर मदनलाल (45) हे दोघे जखमी झाले. जखमींना शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. आंधळे यांनी सांगितले.