टीआरपी घोटाळा- माफीचा साक्षीदार झालेल्या आरोपीचा जामीन अर्ज मंजूर

टीआरपी घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका आरोपीचा मेट्रोपोलिटीन कोर्टाने आज जामीन अर्ज मंजूर केला. माफीचा साक्षीदार बनल्याने आरोपी उमेश मिश्रा याच्या जामीन अर्जाला पोलिसांनी विरोध केला नाही.

दरम्यान मिश्रा माफीचा साक्षीदार झाल्याने इतर चॅनलचे मालक धास्तावले असून टीआरपी घोटाळ्याप्रकरणी बरीच माहिती उघडकीस येण्याची शक्यता आहे.

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी 10 लोकांना अटक केली आहे. प्रकरणाचा अधिक तपास क्राईम इंटेलिजन्स युनिट करत असून त्याने आपला गुन्हाही कबूल केला आहे. टीआरपी रॅकेट कधी पासून सुरू आहे कशा प्रकारे सुरू आहे किती चॅनेल ने पैसे दिले. याची माहिती मिश्राने तपास यंत्रणाना दिली आहे.

अजय उमापती यांनी माहिती देताना सांगितले की उमेशचा जामीन पोलिसांनी मंजूर केला आहे. तर न्यायालयाने आरोपी रामजी शर्मा, दिनेश विश्वकर्मा, अभिषेक कोलवणे यांना 28 ऑक्टोबर पर्यंत कोठडीची शिक्षा सुनावली आहे.

तसेच आरोपी बोमपेल्ली राव मिस्त्राr, शिरीष पट्टनशेट्टी, नारायण शर्मा, विनय त्रिपाठी यांची याचिका फेटाळून लावली आहे. याप्रकरणी रिपब्लिक, न्युज नेशन, महामुव्ही, फक्त मराठी, बॉक्स सिनेमा या चॅनलचे चालक मालक यांची चौकशी होणार असून पोलिसांनी महा मुव्ही चॅनलचे सीईओ संदीप वर्मा आणि बिझनेस हेड अमित दवे यांना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या