नांदेड जिल्ह्यात 43 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण, जिल्ह्यात रुग्णांची संख्या 2

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पिरबुर्ऱ्हाण नगर मधील 64 वर्षीय कोरोना विषाणू संसर्गाच्या कॅरिअर चा अद्याप शोध लागलेला नसताना आज सांयकाळी आलेल्या अहवाल चाचणी नुसार नांदेड च्या अबचल नगर भागातील एका 43 वर्षीय व्यक्तीस कोरोना विषाणू चा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे.  त्यामुळे नांदेड जिल्ह्यात रुग्णांची संख्या आता २ वर पोहोचली आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पहिल्या रुग्णाचा कॅरिअर प्रशासन शोधत असतानाच आज सांयकाळी नांदेड शहरात कोरोनाचा आणखी एक रुग्ण आढळून आला आहे.

पिरबुऱ्हाण नगरातील 64 वर्षीय कोरोनाची लागण झाल्यानंतर तो भाग सील करण्यात आला आहे. सदरील रुग्णाच्या संपर्कात असलेले नातेवाईक, शेजारी अशा 80 जणांचे अहवाल तपासणीत निगेटिव्ह आले आहेत, मग सदरच्या रुग्णाला हा संसर्ग झाला कसा?  या चिंतेत प्रशासन असतानाच आज नांदेडात आणखी एक रुग्णाचा अहवाल पॉझिटीव आला आहे. सदरच्या रुग्णाचे वय 43 वर्ष असून, नांदेड च्या अबचल नगर भागातील तो रहिवासी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार तो ट्रक चालक असून तो दोन दिवसापूर्वी त्याला बरे वाटत नसल्याने शासकीय रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले होते. त्याचा स्वॅब चा अहवाल आज सांयकाळी पॉझिटीव आल्याने शहरातील कोरोना विषाणू संसर्ग रुग्णाची संख्या २ वर पोहोचली आहे. पोलीस व महानगरपालिकेचे पथक या भागात पोहोचले असून वैद्यकीय तपासणी,सदरच्या रुग्णाची कौटुंबिक माहिती, त्याने केलेला प्रवास याचे संदर्भ घेण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.

दरम्यान अबचल नगर व सभोवतालचा 2 किलोमीटर चा परिसर सील करण्यात आला आहे.  सदर ट्रक चालकाने 5 दिवसांपूर्वी पंजाब राज्याचा प्रवास केल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले