
चातकः स्वानुमानेन जलं प्रार्थयतेऽम्बुदात् ।
स स्वौदार्यतया नित्यं प्लावयत्यम्बुदो महीम् ।।
चातक पक्षी आपली तहान भागेल एवढ्याच पाण्याची आपल्या गरजेच्या अंदाजाने मेघाकडे याचना करतो; (त्या एवढ्याशा पक्ष्याची तहान ती किती!) परंतु उदार मेघ चातकाच्या एवढ्याशा मागणीपुरता न बरसता आपल्या औदार्याने संपूर्ण पृथ्वीच जलमय करून टाकतो.
येथे चातक म्हणजे याचक आणि मेघ म्हणजे उदार दाता. याचक आपल्या गरजेपुरते थोडेसे मागतो; पण खरा उदार दाता किती मागितले आहे याचा हिशेब न करता आपल्या स्वभावाला साजेसे भरभरून देतो. याचकाची मागणी त्याच्या गरजेएवढी असते; पण दात्याचे दान त्याच्या औदार्याएवढे असते.
डॉ. समिरा गुजर-जोशी






























































