1 हजार डॉलर घ्या आणि अमेरिका सोडा! डोनाल्ड ट्रम्प यांची अवैध नागरिकांना ऑफर

अमेरिकेत अवैधरित्या राहाणारे जे नागरिक स्वेच्छेने देश सोडतील त्यांना 1 हजार डॉलर देण्याची घोषणा ट्रम्प प्रशासनाने केली आहे. अमेरिकन सरकारच्या होमलँड सिक्युरिटीने याबाबत अधिसूचनाही काढली आहे. सीपीबी होम अॅपच्या माध्यमातून अवैधरित्या राहणाऱया नागरिकांना सरकारला सांगावे लागेल की त्यांना मायदेशी परत जायचे आहे.

अवैध नागरिकांनी स्वतःहून सरकारला मायदेशी जाण्याबाबत कळवले तर त्यांना अटक करण्यात येणार नाही. सुरक्षितपणे परत मायदेशी जाण्याचा हा उत्तम पर्याय असल्याचे अमेरिकेचे होमलँड सिक्युरिटीचे सेव्रेटरी किस्टी नोएम यांनी म्हटले आहे.