
टॅरिफ बॉम्बनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी घातलेल्या व्हिसा निर्बंधांचे मोठे हादरे हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेला बसू लागले आहेत. हिंदुस्थानी निर्यात आणि शेअर बाजारानंतर आज रुपयाचे मूल्यही घसरले. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत आज तब्बल 51 पैशांनी घसरून 77.7925 वर गेली. रुपयाच्या किमतीतील घसरणीचा हा आजवरचा नीचांक आहे.
अमेरिकेकडून होत असलेल्या चौफेर आर्थिक नाकेबंदीमुळे उद्योग जगतात चिंतेचे वातावरण आहे. विदेशी गुंतवणूकदारांनीही सावध होत काढता पाय घ्यायला सुरुवात केली आहे. त्याचा परिणाम शेअर बाजार आणि रुपयाच्या किंमतीवर झाला आहे. दिवसाच्या सुरुवातीला रुपया 13 पैशांनी घसरून खुला झाला. मात्र, दिवसभरात त्यात घसरत होत जाऊन तो 88.82 रुपयांवर पोहोचला. दिवसअखेर तो 88.7925 या किमतीवर स्थिरावला. याचाच अर्थ हिंदुस्थानींना आता एका डॉलरसाठी 88.7925 रुपये मोजावे लागणार आहेत