
पैशांची बचत करता येत नाही अशा अनेकांच्या तक्रारी आहेत. परंतु तुम्हाला जर खरोखर पैशांची बचत करायची असेल तर काही गोष्टी त्यासाठी कराव्या लागतील. सर्वात आधी तुमचे मासिक उत्पन्न किती आहे हे पाहा. त्यानुसार खर्चाचा अंदाज घ्या.
खर्च करण्यापूर्वी बचत खात्यात पैसे जमा कर अनावश्यक खर्च करणे टाळा. कमी खर्चाचे पर्याय शोधा त्यामुळे तुम्ही काही पैशांची बचत करू शकाल. तुम्ही जर कर्जात असाल तर कर्ज फेडण्याला प्राधान्य द्या. छोट्या रकमेतून्ही बचत करता येऊ शकते.