तालिबान्यांचा पाकिस्तानात घुसून गावांवर कब्जा

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष चांगलाच पेटला आहे. पाकिस्तानात सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) पाकिस्तानविरुद्ध युद्ध पुकारले आहे. अफगाणिस्तान सीमारेषेजवळील तोखरम येथे पाकिस्तानी सैन्य आणि टीटीपीमध्ये धुमश्चक्री सुरू आहे. पाकिस्तानचे चार सैनिक ठार झाले असून तालिबान्यांनी पाकिस्तानातील अनेक गावांवर कब्जा केला आहे. सुरक्षेसाठी पाकिस्तानने तोखरम सीमारेषा सील केली आहे. खैबर पख्तुनख्वा प्रातांत टीटीपीने पाकिस्तानी सैन्यावर हल्ले सुरूच ठेवले आहेत. पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणा आणि सरकारविरुद्ध आमचे युद्ध आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होणार नाही, अशी काळजी घेत आहोत, असे टीटीपीने म्हटले आहे.