
>> दिव्या नेरुरकर–सौदागर
प्रत्येक बाबतीत असलेल्या नाराजीमुळे संकेत कायमच असमाधानी असायचा. त्याऴा खूप मित्र होते. सगळे वेल सेटल्ड फॅमिलीतले होते. त्याचे शिक्षण इंटरनॅशनल स्कूलमधून झाले. त्याच्या क्लासमधीऴ मुले बिझनेस फॅमिलीतली होती. त्यांना मिळणारा पॉकेटमनी बघून त्याला खूप कॉम्प्लेक्स यायचा. आपण कुठेतरी कमी आहोत ह्याची त्याऴा लाज वाटायची. संकेतला सकारात्मक दृष्टिकोन अधिकाधिक दृढ कसा करावा तसेच आयुष्याचे ध्येय कसे ठरवावे यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. संकेतमध्ये बदल अपेक्षित होता जो त्याच्यात दिसायला लागला. तो शारीरिक तसेच मानसिकदृष्टय़ा सुदृढ दिसू लागला होता.
एका आटपाट नगरात दोन मित्र राहात होते. एक मित्र होता राजाचा मुलगा आणि दुसरा मित्र होता शेतकऱयाचा मुलगा. दोघांच्या मैत्रीमध्ये त्यांच्या श्रीमंती-गरिबीचा भेद कधी आलाच नव्हता. या मित्रांची निखळ मैत्री राजाला मात्र आवडत नव्हती. त्याने राजकुमारला समजवायचा भरपूर प्रयत्न केला; पण राजकुमारने त्याच्या गरीब मित्राशी मैत्री कायम ठेवली. सरतेशेवटी राजाने त्याला दटावले आणि गरीब शेतकऱयाच्या मुलाशी मैत्री तोडण्यास सांगितले. पण, राजकुमार बधला नाही. त्यांची मैत्री कायम राहिली.
एक दिवस राजाने राजकुमाराला बोलावले आणि विचारले, ’तू श्रीमंत आणि तो गरीबाघरचा. तरीही तू का त्याच्याशी मैत्री ठेवतोस? तुला इतर श्रीमंतांची मुलं नाहीत का मैत्री करायला?’ राजाला मध्येच थांबवत राजकुमार म्हणाऴा, ’कोण सांगतं, माझा शेतकरी मित्र गरीब आहे? उलट तो आपल्यापेक्षा श्रीमंत आहे.’ राजाने आश्चर्याने विचारले, ’ते कसं काय?’
त्यावर राजकुमार म्हणाला ’बाबा, माझ्या शयनगृहातल्या खिडकीतून आकाशाचा एक तुकडा दिसतो. पण माझा मित्र जेव्हा त्याच्या अंगणात झोपतो तेव्हा त्याला अखंड आकाश दिसते. माझ्यासाठी पोहायला महालाबाहेर एक तळं आहे, पण माझ्या मित्राच्या घराच्या बाजूने एक मोठी नदी वाहते जिथे तो मनसोक्त पोहतो. मला खेळायला महालात जागा आहे खरी; पण आम्ही दोघं त्याच्या मोठय़ा शेतात खेळतो तेव्हा ते शेत आपल्या अंगणापेक्षा मोठं आहे. तर मला सांगा, आपल्यापेक्षा माझा मित्र श्रीमंत आहे की नाही?’ राजाकडे यावर उत्तर नव्हते. मात्र त्याला आपल्या मुलाच्या ‘सकारात्मक दृष्टिकोना’चे भयंकर कौतुक वाटले.
’मला वाटतं आपणा सर्वांनाही या राजकुमारासारखा दृष्टिकोन हवा.’ माझं हे वाक्य कानावर पडताच संकेतने (नाव बदलले आहे) एक सुस्कारा सोडला आणि कुठल्या तरी विचारांत गुंग झाला. संकेतने नुकतीच बारावीची परीक्षा कशीबशी दिली होती. कारण; त्याचं अभ्यासात लक्ष नव्हतं. त्याच्या पालकांनी खोदून विचारलं तरी तो अभ्यास न करण्याची कारणे सांगत नव्हता.
संकेतमुळे घरात वादावादीचे प्रमाण खूप वाढले होते. आई-बाबांवर तो कायम नाराज असायचा. त्याची दिवसाची सुरुवात दुपारच्या साडेअकरा ते बारा वाजता व्हायची ती त्याच्या कटकटीनेच. संकेतला झोपेतून डिस्टर्ब केलेले चालत नव्हते. तो आईवर वैतागायचा. नाश्ता, जेवणाला कायम त्याचे तोंड वाकडे असायचे. ’तू इतर मित्रांच्या आयांसारखं ‘व्हरायटी
ऑफ फूड’ करत नाहीस. रोजच ते चपाती-भाजी, डाळ-भात!’ असे तिच्या अंगावर ओरडून बिस्किट्स, फरसाण किंवा मॅगी खाऊन तो पुन्हा आपल्या खोलीत लोळत पडायचा.
संकेतला समुपदेशनास आणण्याचे मुख्य कारण त्याचा सगळ्याच बाबतीत असलेला नकारात्मक स्वभाव हे होते. प्रत्येक बाबतीत असलेल्या नाराजीमुळे संकेत कायमच असमाधानी असायचा. लहानपणापासून त्याच्या या स्वभावाला त्याच्या पालकांकडून काहीसे खतपाणी मिळत गेले होते. त्याचे ते कायम ऐकत राहिले होते. पण नंतर त्याची नाराजी आणि चिडचिड ही त्या दोघांसाठी डोकेदुखी झाली.
’मला चांगल्या कोचिंग क्लासला घातलं नाही म्हणून मी अभ्यास नाही करणार,’ असे म्हणत त्याने क्लासकडे आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष केले.
’आम्ही आहोत म्हणून याचे लाड आहेत. पुढे काय होईल याचं?’ संकेतचे वडील बोलताना गंभीर होते. ‘तुम्हीच बोला याच्याशी,’ काहीशा हतबलपणे संकेतकडे बघत आईवडीऴ केबिनबाहेर गेले.
संकेत शांतच होता. त्याला ’हे खरं आहे का?’ असं विचारताच त्याने नजर चुकवली. मग हळूहळू बोलता झाला
’मॅम, मला खरंच माझा स्वभाव बदलायचा आहे. माझ्या अशा वागण्याचा आईबाबांना खूप त्रास होतो हे कळतं मऴा. पण यातून बाहेर कसं पडू?’
संकेत त्याच्या मनातील द्वंद्व बोलू पाहात होता. ’मला मित्र खूप आहेत. सगळे वेल सेटल्ड फॅमिलीतले आहेत. माझं शिक्षण इंटरनॅशनल स्कूलमधून झालं. त्यामुळे माझ्या क्लासमध्ये जास्तीत जास्त मुलं ही बिझनेस करणाऱया फॅमिलीतली होती. त्यांच्याकडे पाहून, त्यांना मिळणारा पॉकेटमनी बघून मला खूप कॉम्प्लेक्स यायचा. कोणी कधी मला चिडवलं नाही. पण कधी शाळेच्या कॅन्टीनमध्ये जेव्हा मला काही खायला हवं असायचं आणि तेवढा पॉकेटमनी जवळ नसायचा तेव्हा हे मित्र माझ्यासाठी सुद्धा पे करायचे. मला ऑकवर्ड व्हायचं. आपण कुठेतरी कमी आहोत ह्याची लाज वाटायची.’
’त्यांचा स्वतचा मेहनतीचा पॉकेटमनी होता का रे?’ असं त्याला विचारताच संकेत पटकन ‘नाही’ म्हणाला आणि हळूच हसला. ’बरं एक सांग, तुम्ही गरीब आहात का ज्यांना एकवेळचं जेवणही मिळत नाही?’ संकेतने खाली मान घालतच नकार दिला. ’मग तू गोष्टीतल्या राजकुमारासारखा का नाही विचार करत?’ असे सांगताच तो ’हं’ म्हणाला आणि विचारांत गुंग झाला. संकेतवर काम करणे सोपे होते, कारण त्याने त्याची समस्या समजून घेतली होती. सुरुवातीला त्याच्या रागावर आणि नकारात्मक विचारांवर काम सुरू झाले. त्याला राग आणि नकारात्मकता हे दुष्टपा कसे मानसिक आरोग्यावर आणि शेवटी प्रगतीवर परिणाम करते हे त्याच्याच उदाहरणावरून समजावण्यात आले. बाकी प्रािढयेत संकेतच्या पालकांना समाविष्ट करून ती दोघं संकेतला कशी मदत करू शकतील याचे त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यासाठी त्यांना वास्तववादी राहणे, संकेतला त्याच्या वयाप्रमाणे वागणूक देणे, त्याला जबाबदाऱया देणे, घरातील निर्णय प्रािढयेत सामील करणे ह्या गोष्टी समजावण्यात आल्या. (लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत)





























































