दोन वर्षांच्या मुलीला चावला साप, चिडलेल्या मुलीने केले दोन तुकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सापाला पाहून भल्याभल्यांची भीतीने गाळण उडते. तोच साप जर चुकून चावला तर मग पाहायलाच नको. पण, एका दोन वर्षांच्या चिमुरडीने चक्क सापाचे दोन तुकडे केल्याची घटना घडली आहे.

ही घटना तुर्कस्तानमध्ये घडली आहे. तुर्कस्तानच्या एका गावात 10 ऑगस्ट रोजी एका गावातल्या घराच्या अंगणात दोन वर्षांची मुलगी खेळत होती. तिचे आई वडील घरात होते. काही वेळाने ते अंगणात गेले. तिथे त्यांना जे चित्र दिसलं ते भयंकर होतं.

त्यांच्या दोन वर्षांच्या मुलीने हातात सापाला पकडून चावत होती. तिच्या ओठांजवळ सापाने चावल्याच्या खुणा होत्या. जवळपास अर्धा मीटर लांबीचा साप त्या मुलीने दातांनी चावला होता. सापाचे दोन तुकडे झाले होते. ते पाहून बिथरलेल्या जोडप्याने तिला ताबडतोब रुग्णालयात दाखल केलं.

सुदैवाने तो साप विषारी नव्हता. पण, तरीही मुलीला 24 तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं. आता ती मुलगी तंदुरुस्त असल्याची माहिती मिळत आहे. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलीच्या हातात तो साप होता. ती त्याच्याशी खेळत होती. मध्येच सापाने तिला दंश केला. मात्र, या हल्ल्याने घाबरण्याऐवजी चिडलेल्या मुलीने त्याचे चावून दोन तुकडे केले.