
मुंबईतील एका टीव्ही अभिनेत्याविरुध्द सीबीआयने बाल अत्याचार प्रतिबंधक कायदा (पॉक्सो) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत आज गुन्हा दाखल केला.
हा अभिनेता लहान मुलांचे आंतरराष्ट्रीय रॅकेट चालवत होता. हिंदुस्थानसह दक्षिण आशिया, युरोप आणि अमेरिकेतील लहान मुले त्याच्या जाळ्यात अडकली असल्याचे चौकशीत उघड झाले.
मूळचा हरिद्वार येथील रहिवासी असलेल्या या अभिनेत्याने काही टीव्ही मालिकांमध्ये ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम केले आहे. हा अभिनेता अल्पवयीन मुलामुलींना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करायचा. त्यानंतर त्यांची छायाचित्रे, व्हिडियो तो सोशल मीडिया अॅप्सवरून परदेशातील ग्राहकांना पाठवायचा. त्याच्याकडून मोबाईल फोन्स, लॅपटॉप्स जप्त केले.






















































