
महानगरपालिकेने अभिनेत्री कंगना राणावतच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. त्यावेळी टीव्ही मीडियातील काही नवख्या पत्रकारांनी पालिका कर्मचारी समजून चक्क खाकी गणवेषातील पोस्टमनलाच घेतले. ‘कंगना का ऑफीस क्यू तोडा आपने?’ असे विचारत त्यांनी पोस्टमनवर प्रश्नांची सरबत्ती केली. आपण ते बांधकाम तोडले नाही, आपण पोस्टमन आहोत असे ते पोस्टमन ओरडून सांगत होते. त्यानंतरही एकापाठोपाठ एक माईकचे दांडके त्यांच्या तोंडाजवळ नेत त्यांना विचारणा केली जात होती.
Arey Main Postman hu…..Arey maine nahi toda…..Arey Main POSTMAN hu…..#entertainmentjournalism#KanganaVsSena @RoadsOfMumbai pic.twitter.com/vPmFqRilLC
— Virat A Singh (@tweetsvirat) September 9, 2020
टीआरपीच्या स्पर्धेत पोस्टमनच्या शर्टवर असलेला ‘भारतीय डाक’चा लोगोही टीव्हीवाल्यांना दिसला नाही. अखेर एका पत्रकाराच्या ते लक्षात आल्यानंतर पोस्टमनची गराडय़ातून सुटका झाली.
…म्हणून पालिकेने कंगनाला केले नाही होम क्वॉरंटाइन
विमानमार्गे येणारा कोणताही प्रवासी हा सात दिवसांपेक्षा कमी कालावधीसाठी मुंबईत राहायला येत असेल तर त्याला होम क्वॉरंटाइन करता येत नाही. अभिनेत्री कंगना राणावत मुंबईत केवळ सहा दिवसांसाठी राहायला आली आहे. त्यामुळे नियमानुसार पालिकेने तिला होम क्वॉरंटाइन केलेले नाही, अशी माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी दिली.
मुंबई महाराष्ट्राचीच, आठवले गटाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधी भूमिका
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही मुंबई महाराष्ट्राचीच असे वारंवार ठणकावून सांगितले होते. अभिनेती कंगना राणावतने मुंबईसह महाराष्ट्राचा अपमान केला. तेव्हा रामदास आठवले गटाने बाबासाहेबांच्या भूमिकेशी विसंगत निर्णय घेतला आणि कंगनाच्या समर्थनाथ रस्त्यावर उतरले याबद्दल आश्चर्य व्यक्त होते आहे.


























































