प्रियांकाच्या लग्नात फटाक्यांची आतिषबाजी, नेटकरी म्हणाले प्रियांका ‘ढोंगी’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेत्री प्रियांका चोप्रा 1 डिसेंबर रोजी निक जोनस सोबत ख्रिश्चन पद्धतीने विवाहबद्ध झाली. बॉलिवूडमधलं हे बहुचर्चित लग्न आहे. जोधपूर येथील उमेद भवन पॅलेसमध्ये रंगत असलेल्या या सोहळ्याला एका कारणावरून सध्या चांगलंच ट्रोल केलं जात आहे.

प्रियांका आणि निक ख्रिश्चन पद्धतीने विवाहबद्ध झाल्यानंतर उमेद भवन पॅलेसवर फटाक्यांची आतिषबाजी केली गेली. त्याचे व्हिडीओही व्हायरल झाले. त्यानंतर नेटकऱ्यांनी याच गोष्टीवरून प्रियांकाला ट्रोल करायला सुरुवात केली. काही काळापूर्वी आपण अस्थमाची रुग्ण असल्याने धुरामुळे होणारा त्रास समजू शकतो, अशा आशयाची एक जाहिरात प्रियांकाने केली होती. त्यात तिने प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संदेशही दिला होता. त्या जाहिरातीची आठवण देत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. तिला दुटप्पी आणि ढोंगी म्हणत नेटकऱ्यांनी झोडपून काढलं.

पाहा आतिषबाजीचा व्हिडीओ-

अनेकांनी तिच्या या कृतीची मनसोक्त खिल्ली उडवली. तिच्या जाहिरातीपासून मीम्स बनवत तिच्या लग्नात केलेल्या आतिषबाजीवर नेटकऱ्यांनी ताशेरे ओढले आहेत.