ट्विटरने दिल्ली, मुंबईतील कार्यालयाला टाळे ठोकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एलन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यापासून ते सतत वादग्रस्त निर्णय घेत आहेत. ट्विटरने शुक्रवारी हिंदुस्थानातील आपली तीनपैकी दोन कार्यालये बंद केली असून कर्मचाऱयांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना दिल्या आहेत. बंद करण्यात येणाऱया कार्यालयांमध्ये दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांचा समावेश आहे. तर बंगळुरूमधील कार्यालय पूर्वीप्रमाणेच सुरू राहील. खर्चात कपात करण्यासाठी पंपनीने हे पाऊल उचलले आहे. एलन मस्क यांनी 27 ऑक्टोबर 2022 रोजी ट्विटर 44 अब्ज डॉलरना विकत घेतले. यानंतर मस्क यांनी पंपनीच्या चार उच्चपदस्थ अधिकाऱयांना डच्चू दिला. यात सीईओ पराग अग्रवाल यांचाही समावेश होता. ट्विटरचा आर्थिक तोटा कमी करण्यासाठी मस्क सतत खर्चात कपात करत आहेत. नोव्हेंबरमध्ये देशातील 90 टक्के कर्मचाऱयांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. या निर्णयानंतर आता पंपनीने मुंबई आणि नवी दिल्लीतील ऑफिस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.