
सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या ट्विटर आणि केंद्र सरकारमध्ये सध्या वादविवाद सुरू आहेत. केंद्र सरकारने नुकताच मंत्रिमंडळाचा विस्तार करत फेरबदल करत खासदार राजीव चंद्रशेखर यांच्याकडे ही नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्याकडे आयटी राज्यमंत्री पदाची त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र त्यांनी पदभार स्वीकारताच त्यांच्या ट्विटर खात्यावरील ब्लू टिक हटवण्यात आले आहे. ट्विटरच्या या खोडय़ांमुळे पुन्हा एकदा ट्विटर विरुद्ध केंद्र सरकार हा वाद उभा राहिला आहे. केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आपले युजरनेम बदलले होते. त्यामुळे ट्विटरने ब्लू टिक हटविल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी राजीव चंद्रशेखर यांचे
ट्विटर हँडल
Rajeev MP या नावाने होते. त्यानंतर आता मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर Rajeev GOI असे करण्यात आले आहे.




























































