अयोध्याप्रकरणी निकाल जाहीर; #hindumuslimbhaibhai ट्विटरवर ट्रेडिंग

963

70 वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील वादग्रस्त जागे संदर्भात निकाल दिला आहे. ही जागा प्रभू श्री रामाची म्हणजेच रामलल्लाचीच असल्याचे न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितले. या आदेशासोबतच इथे राम मंदीर निर्माणाचा मार्ग मोकळा झाला आहे. या निकालामुळे देशभरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत असताना नेटकऱ्यांनी मात्र #hindumuslimbhaibhai हा ट्रेंड सुरू केला आहे.

‘आम्ही आधीही एक होतो, आम्ही आताही एक आहोत,’ अशी प्रतिक्रिया अनेक नेटकरी ट्विटरवर मांडत आहे. तसेच अनेक नेटकरी ट्विटरवर ट्विट करून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे संदेश देताना दिसत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या