भाजपने उमेदवारी दिलेल्या भोजपुरी कलाकारांचे काय झाले? वाचा सविस्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

भाजपने यंदा अनेक क्षेत्रातील लोकांना उमेदवारी दिली होती. त्यापैकी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचाही समावेश होता. भाजपने तीन भोजपुरी कलाकारांन यंदा तिकीट दिले होते. मनोज तिवारी निरहुआ यांना दिल्ली तर रवि किशन यांना उत्तर प्रदेशातून भाजपने मैदानात उतरले होते.

तीन उमेदवारांपैकी फक्त निरहुआने हार पत्करली असून दोघांनी विजयश्री मिळवली आहे. रवि किशनने गेल्यावेळी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती आणि हार पत्करावी लागली. यंदा रवि किशनने भाजपमध्ये प्रवेश घेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बालेकिल्ला समजला जाणार्‍या गोरखपूरमधून निवडणूक लढवली होती. रवि किशन यांनी सपाचे उमेदवार रामभुल निषद यांचा तीन लाखहून अधिक मतांनी पराभव केला आहे.

तर दुसरीकडे सपाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या विरोधात आझमगडमध्ये निरहुआला भाजपने उमेदवारी दिली होती. अखिलेश यादव यांनी निरहुआला मोठ्या मताधिक्याने पराभव केला आहे.

दिल्लीचे भाजप प्रदेशाध्यक्ष आणि भोजपुरी स्टार मनोज तिवारी हे सुद्धा विजयाच्या मार्गावर आहेत, त्यांची लढत दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित यांच्या विरोधात होती.