बुलढाण्यात आढळले कोरोनाचे दोन रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 32 वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बुलढाणात जिल्ह्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 32 वर गेली आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेले 50 अहवाल आज प्राप्त झाले असून त्यापैकी 48 अहवाल निगेटीव्ह व दोन अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. पॉझीटीव्ह रूग्णांमध्ये  32 वर्षीय महिला व  22 वर्षीय तरूणाचा समावेश आहे.

आतापर्यंत 796 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 32 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  आतापर्यंत 24 कोरोनाबधीत रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 24 आहे.  सध्या रूग्णालयात पाच रूग्ण कोरोनाबाधीत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.