
वाघाच्या हल्ल्यात गुरे चरण्यासाठी नेलेल्या दोन गुराख्यांवर वाघाने हल्ला करून त्यांना ठार केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील कवळपेठ गावालगतच्या जंगलात घडली. ढिवरू वासेकर (वय 55) आणि नानाजी निकेसर (वय 53) अशी वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या गुराख्यांची नावे आहेत. घटनेची माहीती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळावर पोहचले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.


























































