Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, गोळीबारात दोघांचा मृत्यू

देशात लोकसभा निवडणूकीचा प्रचार सुरू असताना मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. मणिपूरमधील इंफाळ व कांगपोकपी जिल्ह्यात दोन गटात हिंसाचार उसळला असून यावेळी झालेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला. ज्यांचा मृत्यू झाला ते दोघेही कुकी समाजाचे असल्याचे समजते.

कांगपोकपी जिल्ह्यात बंदचे आवाहन

गोळीबाराच्या घटनेनंतर कुकी समाजाच्या दोघांच्या मृत्यूच्या विरोधात कमेटी ऑन ट्राइबल यूनिटीने कांगपोकपी जिल्ह्यात बंदचे आवाहन केले आहे. 13 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून ते 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत पूर्ण बंदचे आवाहन केले आहे.