चित्त्यांच्या सुरक्षेसाठी ठेवले दोन हत्ती, वाचा काय करतात हे हत्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तब्बल 70 वर्षानंतर हिंदुस्थानात चित्ते आणण्यात आले आहेत. नामिबियामधून आणलेले ते चित्ते मध्य प्रदेशमधील कुणो अभयारण्यात सोडले आहेत. या चित्त्यांच्या सुरक्षेसाठी आता या अभयारण्यात दोन हत्ती तैनात करण्यात आले आहेत.

चित्त्यांसाठी खासकरून सातपुरा व्याघ्र प्रकल्पातील दोन हत्ती कुणो अभयारण्यात आणलेले आहेत. लक्ष्मी व सिद्धनाथ अशी त्या हत्तींची नावं आहेत. या हत्तींना महिनाभराआधीच या अभयारण्यात सोडलेले आहे. चित्त्यासाठी तयार केलेल्या विशेष भागात कोणत्याही अन्य प्राण्याला प्रवेश करू न देण्याचे मुख्य काम या हत्तींचं आहे. सुरक्षा रक्षकांच्या मदतीने हे दोन्ही हत्ती दिवसरात्र त्या चित्त्यांवर लक्ष ठेवून आहेत. हे चित्ते तब्बल महिनाभरात क्वारंटाईनमध्ये राहणार आहेत.