जपानच्या क्रुझवरील दोन हिंदुस्थानींना कोरोनाची लागण

268

जपानच्या बंदराकर उभ्या असलेल्या ‘डायमंड प्रिन्सेस’ क्रुझवर असलेल्या प्रवाशांमध्येही कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढायला लागला आहे. क्रुझवरील आणखी 137 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले असून त्यात दोन हिंदुस्थानी नागरिकांचाही समावेश आहे. सोमवारपासून या क्रुझवरील प्रवासी व कर्मचाऱयांची अंतिम वैद्यकीय चाचणी होणार आहे. कोरोनाचा संसर्ग न झालेल्या हिंदुस्थानी नागरिकांना क्रुझवरून बाहेर वाढण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, असे टोकियोमधील हिंदुस्थानी दूतावासाने स्पष्ट केले आहे. क्रुझवर शनिवारी आणि रविवारी झालेल्या वैद्यकीय चाचणीत कोरोनाचा संसर्ग झालेले 137 नवे रुग्ण आढळले आहेत. यात हे दोन हिंदुस्थानी नागरिक आहेत. त्यांना उपचारासाठी योकोहामा बंदराजवळ उभारण्यात आलेल्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. याआधी तेथे तीन हिंदुस्थानींना कोरोनाचा संसर्ग झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या