आकर्षक डिझायनचे सोन्याचे दागिने बनवून देण्याची ऑर्डर घेऊन झव्हेरी बाजारातील सोने व्यापाऱयाला 42 लाखांचा चुना लावून दोघे भामटे राजस्थानला पळाले होते. व्यापाऱयाकडून 42 लाख दोन हजार रुपयांच्या नोटा घेतल्याने तो काही आपल्याविरोधात तक्रार करणार नाही, अशा भ्रमात आरोपी होते. परंतु लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी आरोपींचा भ्रमनिरास करत त्यांना राजस्थानात जाऊन पकडले व 32 लाखांची रोकड हस्तगत करण्याचे काम फत्ते केले.
शहा (नाव बदलेले) यांचा सोन्याचे दागिने खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. ते 19 मे रोजी हैदराबाद येथे दागिन्यांच्या प्रदर्शनाला गेले होते. तेथे त्यांना हुकूमसिंग नावाचा एक व्यक्ती भेटला व त्याने तो सोने व्यापारी असल्याचे सांगून त्याच्याकडे असलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या वेगवेगळ्या डिझाईनचे पह्टो शहा यांना दाखवले. ते पह्टो आवडल्याने शहा यांनी 50 लाखांचे सोन्याचे दागिने बनविण्याची ऑर्डर हुकूमसिंग यांना दिली.
त्यानंतर 22 मे रोजी सकाळी हुकूमसिंग याने शहा यांना पह्न करून सोन्याच्या दागिन्यांची ऑर्डर तयार असल्याचे सांगून पैशांची मागणी केली. मात्र दागिने मिळाल्यावरच पैसे देईन, असे शहा यांनी सांगितले. त्यावर हुकूमसिंग याने शिताफीने शहा यांचा विश्वास संपादन करून आधी काही रक्कम देण्याची गळ घातली. त्याला बळी पडत शहा यांनी हुकूमसिंग याने पाठविलेल्या व्यक्तीकडे दोन हजार रुपयांच्या स्वरुपात 42 लाखांची रोकड दिली.