जालन्यात एकाच दिवसात दोन खुनाच्या घटना; राजुरात भरदिवसा डोक्यात कुर्‍हाडीने वार करून खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यात रविवारी दोन खुनाच्या घटना घडल्या असून रविवारी सकाळी जालना शहरात एका तरुणाचा तर भोकरदन तालुक्यातील राजुरात एकाचा कुर्‍हाडीने वार करुन करण्यात आल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. दुसरी घटना भोकरदन तालुक्यातील राजूर येथे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन गोरक्षनाथ आत्माराम कुमकर (58, रा.राजूर) यांचा दिवसाढवळ्या दोन अज्ञात आरोपींनी डोक्यात कुर्‍हाडीने वार करून खून करण्यात केला आहे. या घटनेमुळे राजूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हा खून जमिनीच्या व प्लॉटिंगच्या वादातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

गोरक्षनाथ कुमकर रविवारी दुपारी राजूर-चनेगाव रस्त्यावर घराचे काम सुरू असलेल्या ठिकाणी बसले होते. त्यावेळी मागच्या बाजूने दोन जण तोंडाला कपडा बांधून आले व त्यांनी काही कळण्याच्या आतच कुंमकर यांच्या डोक्यात कुर्‍हाडीने वार केले. त्यामध्ये कुमकर यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपींनी पळ काढला. ही घटना शेजारी राहत असलेल्या एका महिलेने बघितली. मात्र तोपर्यंत आरोपी पळून गेले होते. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक वेशाली पवार यांनी कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. रविवारी राजूरचा आठवडी बाजार असल्याने ही घटना वार्‍यासारखी गावात पसरली. नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.