विजेच्या तारा तुटून पडल्या, दोन बैल जागीच ठार

161

सामना प्रतिनिधी । धर्माबाद

शेतीच्या कामासाठी मौजे आलूर शिवारातील शेताकडे जाणाऱ्या शेतकऱ्याच्या दोन बैलांचा जीव महावितरण कंपन्यांच्या बेजबाबदार कारभारामुळे गेला आहे. रस्त्यात तुटून पडलेल्या हाय व्होल्टेज वीज प्रवाह असलेल्या तारांना स्पर्श झाल्यानं एका शेतकऱ्याच्या बैल जोडीचा मृत्यू झाला आहे.

सुभाष यादवराव शिंदे हे सिरसखोड येथे राहतात. शुक्रवारी पहाटे ते शेतीच्या कामासाठी बैल जोडीला घेऊन निघाले होते. अंधारामुळे पुढचा रस्ता अंधूक दिसत होता. पण नेहमीचा रस्ता असल्यानं ते तसेच पुढे निघाले. पण त्यांचा अंदाज चुकला, कारण पुढे रस्त्यात पडलेल्या हाय व्होटेजच्या तारांना त्यांच्या बैल जोडीचा स्पर्श झाला आणि ते दोन्ही बैल जागीच ठार झाले. सुदैवानं सुभाष शिंदे बचावले. ऐन शेतीच्या कामाच्या वेळी झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या