विनामास्क कारवाईवेळी पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण; दोघांना अटक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कॅम्प परिसरात विनामास्क कारवाई करताना पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण करणाऱ्या दोघांना लष्कर पोलिसांनी अटक केली. ही घटना बुधवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास कॅम्पमधील चारबावडी पोलीस चौकीसमोर घडली. बबलू अन्वर सैय्यद (वय 25) आणि आयुब जावेद शेख (वय 20, दोघेही रा. कॅम्प) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गणेश कुलाळ यांनी तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी 11.15 वाजण्याच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक गणेश कुलाळ पोलीस पथकासह मोहम्मद स्ट्रीट परिसरात विनामास्क नागरिकांवर कारवाई करीत होते. त्यावेळी पोलिसांनी तेथे आलेल्या बबलू आणि आयुबला विनाकारण पदपथावर उभे राहू नका, असे सांगितले. त्याचा राग आल्यामुळे दोघांनी गणेश यांना मारहाण केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एच. एम. शिळमकर तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या