आकाशात दोन विमानांची टक्कर, खासदारासह सात जणांचा मृत्यू

2746

अमेरिकेतल्या अलास्कामधील पेनीनसुला प्रांतात दोन विमानांची आकाशात टक्कर झाली. या भीषण अपघातात एका खासदारासह सात जणांचा मृत्यू झाला आहे. सोलडोटना येथील विमानतळाजवळ हा अपघात घडला.

टेस्टी भजी न बनविल्याने नावं ठेवली, नवऱ्याला हिंस्त्र पद्धतीने ठार मारलं

या अपघातात अलास्काचे खासदार गॅरी क्नॉप याचा मृत्यू झाला. ते त्यांच्या खासगी विमानाने प्रवास करत होते. तर दुसऱ्या विमानात चार कॅरोलिनाचे पर्यटक प्रवास करत होते. या दोन्ही विमानांची टक्कर झाली त्या ठिकाणी खाली महामार्ग होता. सुदैवाने दोन्ही विमानं खाली कोसळली तेव्हा महामार्गावर एकही गाडी नव्हती. त्यामुळे मोठा अपघात टळला. या अपघातात दोन्ही विमानांचे वैमानिक ठार झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या