
कोरोनाने आणखी दोन पोलीस आज शहीद झाले. कांदिवली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संभाजी नागरे आणि दहिसर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संदीप तावडे यांचा कोरोनाने मृत्यू झाला.
कांदिवली पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे उपनिरीक्षक संभाजी नागरे हे चारकोप येथे राहत होते. त्यांना गेल्या वर्षी उपनिरीक्षक पदी बढती मिळाली होती. 16 एप्रिलला संभाजी यांची कोविड चाचणी करण्यात आली. त्यांना कोविड झाल्याने उपचारासाठी सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान आज सायंकाळी संभाजी यांचा मृत्यू झाला.
तर दहिसर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संदीप तावडे यांचा देखील कोरोनाने मृत्यू झाला. तावडे यांची 22 एप्रिलला कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना 26 एप्रिलला अंधेरीतील सेव्हन हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची ऑक्सिजन लेवल कमी झाली होती, त्यांची प्रकृती पुन्हा खालावली. आज त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.



























































