आग्रीपाड्यात लिफ्टमध्ये अडकून 2 सुरक्षारक्षकांचा मृत्यू

इमारतीच्या बेसमेंटला पाणी चालू करण्यासाठी गेले असता तेथे पावसाचे पाणी साचलेले असल्याने दोघे सुरक्षा रक्षक लिफ्टमध्ये चढले. पण लिफ्ट सुरू झाली नाही शिवाय आतमध्ये अडकून पडल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आग्रीपाडा येथे घडली.

बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आग्रीपाडाच्या  काळा पाणी जंक्शन जवळ नाथानी रेसिडेन्सी येथे दोन सिक्युरिटी गार्ड बिल्डिंगचे बेसमेंट मध्ये पाणी चालू करण्यासाठी गेले होते. बेसमेंटमध्ये पावसाचे पाणी भरल्याने दोघे लिफ्टमध्ये अडकले. फायर ब्रिगेडने घटनास्थळी येऊन लिफ्टची वरील बाजू कापून काढून दोन्ही सुरक्षारक्षकांना बाहेर काढले. परंतु जमीर अहमद सोहनन (32), शेहजाद मोहम्मद सिद्दीकी मेमन (37) या दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या