दोन बहिणींची गळफास घेत आत्महत्या; नैराश्यातून संपवले जीवन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन सख्ख्या बहिणींनी एकाच वेळी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये घडली आहे.एकाचवेळी दोन बहिणींनी आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्या दोघी ताणतणावात आणि नैराश्यात असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. त्यातून त्यांनी आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बालघाट येथील सेक्टर क्रमांक 11 येथे राहणाऱ्या रीटा (38) आणि तिची सख्खी बहीण संगीता (36) या दोघांनी एकाचवेळी घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. रीटा आणि संगीता यांचे वडील महारुलाल कारसर्पे यांचा तीन वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. तर एका महिन्यापूर्वी त्यांच्या आईचे कोरोनाने मृत्यू झाला.

आईच्या मृत्यूनंतर दोघी बहिणी सतत चिंताग्रस्त असायच्या. त्या ताणतणावात आणि नैराश्यात असल्याचे दिसून येत होते, असे शेजाऱ्यांनी सांगितले. त्यांचा लहान भाऊ सुनील बैतूल येथे कंपनीत कामाला आहे. तो काही दिवसांपूर्वीच घरी आला होता. काही कामानिमित्त तो शेजारच्या गावात गेला होता. तर त्यांचा मोठा भाऊ अनिल वरच्या मजल्यावर काम करत होता. त्यावेळी या दोघी तळमजल्यावर एकट्याच होता. त्याचवेळी त्यांनी साडीने गळफास घेत एकत्र आत्महत्या केली. अनिल तळमजल्यावर आला, तेव्हा रीटा आणि संगीता गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याला दिसल्याा.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोन्ही बहिणींचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले. त्यांनंतर कुटुंबियांकडे मृतदेह देण्यात आले. दोन बहिणींच्या आत्महत्येच्या कारणांचा पोलीस शोध घेत आहेत. आईच्या मृत्यूनंतर दोघी बहिणी नैराश्यात होत्या,  असे शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले आहे. त्यांनी ताणतणाव आणि नैराश्यामुळे आत्महत्या केल्याची शक्यता आहे. मात्र, त्यांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.