आई गेली हे कळालं नाही, बहिणींनी मृतदेहासोबत अख्खं वर्ष काढलं

पती-पत्नी आणि दोन मुली असा सुखी संसार सुरु असतानाच पती, दोन मुली आणि पत्नीला वाऱ्यावर सोडत निघून गेला. पती घर सोडून गेल्यानंतर एक वर्षाने पत्नीचे निधन झाले. दु:खाच्या आघातात सापडलेल्या दोन्ही मुलींनी आईचा अंत्यविधी केला नाही. दोन वर्ष त्यांनी आईचा मृतदेह घरातच ठेवला होता. शेजाऱ्यांना संशय आल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला.

उत्तर प्रदेशमधील वाराणसी शहरात एका महिलेचा डिसेंबर 2022, मध्ये मृत्यू झाला. या महिलेचा पती एक वर्षांपूर्वीच महिलेला आणि दोन मुलींना सोडून घरातून निघू गेला होता. पत्नीचा मृत्यू झाला तरी पती अंतीम दर्शनासाठी आला नाही. दरम्यान, पल्लवी त्रिपाठी (27) आणि वैश्विक त्रिपाठी (18) या दोन बहिणींनी मृत आईचा अंत्यविधी न करता मृतदेह घरातच ठेवला होता. मागील दोन वर्षांपासून त्या आईच्या मृतदेहासोबत राहत होत्या. गेल्या काही आठवड्यांमध्ये घरातून कोणीही बाहेर न आल्याने शेजारी राहणाऱ्या नागरिकांना संशय आला. दरवाजा ठोठावल्यानंतरही घरातून प्रतिसाद येत नव्हता. त्यामुळे शेजारी राहणाऱ्यांनी याची माहिती पोलीसांना दिली.

पोलीसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सुरुवातीला दरवाजा ठोठावला पण प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी त्यांना दरवाजा तोडावा लागला. घरात प्रवेश केल्यावर महिलेचा कुजलेला मृतदेह जमिनीवर पडलेला पाहून पोलीस पथकाला धक्काच बसला, मृत महिलेच्या दोन्ही मुली मृतदेहाशेजारी बसलेल्या त्यांना दिसून आल्या. महिलेचा मृत्यू कसा झाला? अंत्यविधी का करण्यात आला नाही? या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरु असून दोन्ही मुलींना ताब्यात घेण्यात आलं आहे.