आष्टीत तलावात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

905

तलावामध्ये बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथे घडली असून संकेत बापू आघाव (इयत्ता दुसरी) व महेश सतेश आंधळे (इयत्ता तिसरी) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. शनिवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. लिंबोडी येथील कैलास आंधळे यांची तलावाजवळ शेती असून ते तलावात बैल धूत असताना त्यांच्यासोबत बहिणीचा मुलगा संकेत व भावाचा मुलगा महेश हे दोघे होते. त्यावेळी बैल  पळाल्याने त्यांना धरण्याकरीता कैलास धावले असता संकेत व महेश हेदेखील तलावाच्या दिशेने धावत पाण्यात शिरले. पाणी जास्त असल्याने त्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला. सकेंत हा खिळद येथील असून  दिवाळी सणासाठी लिंबोडी येथे मामाच्या गावी आला होता. या घटनेने खिळद व लिंबोडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या