शोपियानमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shopian-encounter

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू कश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात सुरू असलेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. शनिवारपासून या भागात चकमक सुरू आहे. मारले गेलेले दहशतवादी कोणत्या संघटनेचे आहेत ते अद्याप समजू शकलेलं नाही.

दक्षिण कश्मीरातील शोपियाच्या दारमदोरा प्रदेशात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर या भागात शोधमोहीम राबवण्यात आली. दहशतवाद्यांचा माग काढताना दहशवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला प्रत्युत्तर देऊन सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे हत्यारे सापडली आहेत.