
सामना ऑनलाईन । जम्मू
देशभरात प्रजासत्ताक दिनाची धूम सुरू असताना आज पहाटे जम्मू कश्मीरमधील श्रीनगरमध्ये दहशतवादी व जवानांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.
#UPDATE: Security forces neutralise two terrorists during encounter in Khonmoh, Srinagar https://t.co/yeDnv8ROR1
— ANI (@ANI) January 26, 2019
श्रीनगरमधील खानमोह परिसरात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी जवानांना दिली होती. त्यानंतर लष्कराने या भागात शोधमोहिम सुरू केली. या मोहिमेच्यावेळी दहशतवादी व जवानांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. घटनास्थळावरून दोन बंदुका जप्त करण्यात आली आहे. चकमकीनंतर जवानांनी या भागात शोध मोहीम सुरू केली आहे.


























































