दोन दहशतवाद्यांचा खात्मा, शोध मोहीम सुरूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

बारामुल्लातील तझ्झार येथे लपून बसलेल्या दोन दहशतवाद्यांचा हिंदुस्थानच्या लष्काराने खात्मा केला आहे. दहशतवाद्यांच्या विरोधातील शोध मोहीम हिंदुस्थानच्या लष्काराने सुरू ठेवली आहे. आणखी काही दहशतवादी या भागात लपले असल्याची शक्यता असल्याने पुढील काही काळ शोध मोहीम सुरू राहणार असल्याचे कळते.