
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
ब्लॅकमनी रोखण्यासाठी मोदी सरकारने वाजतगाजत जारी केलेल्या नोटाबंदीला नोव्हेंबर 2018 रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत, परंतु ब्लॅकमनीचा ओघ काही घटलेला नाही. एक हजार आणि 500 रुपयांच्या नोटांच्या तुलनेत दोन हजार रुपयांच्या नोटांचे प्रमाण अधिक असल्याने ब्लॅकमनी जमवणे आणखी सोपे झाले आहे. दोन हजार रुपयांच्या नोटा मोठय़ा प्रमाणावर जारी करायच्या होत्या तर नोटाबंदीमागचा हेतू काय होता? दोन हजार रुपयांच्या नोटांमुळे ब्लॅकमनीला प्रोत्साहन मिळाले नाही का ? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
n ब्लॅकमनी आणि नोटा जमवून ठेवण्याला आळा घालण्यासाठी सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद केल्या. नोटाबंदी जारी केल्यानंतर दोन हजार रुपयांच्या नोटांची संख्या मार्च 2017 पर्यंत 328.5 कोटी होती. त्याचे मूल्य 6 लाख 57 हजार कोटी रुपये होते. हा आकडा नोटाबंदीदरम्यान बाजारात उपलब्ध एक हजाराच्या नोटांच्या 6.32 लाख कोटी रुपयांच्या मूल्याच्या तुलनेत खूप मोठा होता.
दोन हजारांच्या नोटांची संख्या 90 टक्क्यांहून अधिक
नोटाबंदीच्या वेळी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांची संख्या 86 टक्के होती. नोटाबंदीच्या दुसऱयाच वर्षी 2017 डिसेंबरमध्ये 500 आणि दोन हजार रुपयांच्या नोटांची संख्या 90 टक्क्यांपेक्षा अधिक झाली. परिणामी, दोन हजारांच्या नोटांमुळे ब्लॅकमनी जमवणे अधिक सोपे झाल्याचेच समोर आले आहे.
नेपाळ–भूतानमध्ये 3,300 कोटी अडकले
नेपाळ आणि भूतानमध्ये बऱयाच काळापासून हिंदुस्थानचे 3,300 कोटी रुपये अडकून पडले आहेत. यात 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांचा समावेश असून एकटय़ा नेपाळमध्ये 3 हजार 200 कोटी रुपये अडकून पडल्याचे ‘आरबीआय’च्या अहवालात म्हटले आहे.
-10 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर 2016 दरम्यान आरबीआयने 2 हजार आणि 500 रुपयांच्या 220 कोटी रुपयांच्या नोटा जारी केल्या. n या नोटांचे मूल्य 6 लाख 57 हजार कोटी रुपये होते.
-मार्च 2017 पर्यंत बाजारात 2 लाख 94 हजार कोटी मूल्ये असलेल्या 500 च्या नोटा उपलब्ध होत्या. n भाजप अध्यक्ष अमित शहा संचालक असलेल्या अहमदाबाद जिल्हा सरकारी बँकेत नोटाबंदीदरम्यान सर्वाधिक 745.59 कोटी मूल्यांच्या बाद नोटा जमा झाल्या.
आरबीआयची आकडेवारी
-एकूण चलन – 15.41 लाख कोटी रुपये
-नोटाबंदीनंतर परत आलेल्या नोटांचे मूल्य – 15.31 लाख कोटी रुपये
-बँकांनी परत न केलेल्या नोटांचे मूल्य – 10 हजार कोटी रुपये


























































