5,956 कोटी मूल्यांच्या नोटा अजूनही बाहेर

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याच्या घोषणेनंतर अजूनही 5 हजार 965 कोटी रुपये मूल्यांच्या दोन हजारांच्या नोटा अद्यापही बाहेर आहेत. मे 2023 पर्यंत 3.56 कोटी रुपये मूल्यांच्या नोटा बाहेर होत्या. परंतु, आता केवळ 98.33 टक्के नोटा आरबीआयकडे आल्या आहेत. नागरिकांकडे जर 2 हजारांच्या नोटा असतील तर त्या देशातील 19 कार्यालयांत जाऊन बदलून घेता येऊ शकतात. काही ठराविक बँका आणि पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या नोटा बदलता येतील, असे आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहेत. देशात मुंबई, नागपूर, दिल्ली, पटणा, तिरुवनंतपूरम, लखनौ, अहमदाबादसह 19 शहरांत आरबीआयच्या कार्यालयात जाऊन या नोटा बदलता येऊ शकतात, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.