
भरधाव दुचाकीने कंटेनरला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार तरूणाचा मृत्यू झाला. त्याचे दोन भाऊ गंभीररित्या जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी रात्री 11.30 सुमारास जांभुळवाडी परिसरात घडला.
सलील महंमदजलीस सौदागर (वय 22, रा. बावधन) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. वारीस महंमद समशाद सौदागर आणि अरबाज महंमद सौदागर असे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. पोलीस अमंलदार अनिल भोसले यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलील आणि त्याचे दोन भाऊ मंगळवारी रात्री 11.30 सुमारास दुचाकीवर बसून चालले होते. त्यावेळी सलीलने भरधाव दुचाकीने समोरील कंटेनरला धडक दिली. गंभीर जखमी झाल्यामुळे सलीलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात त्याचे दोन भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी सहायक पोलीस फौजदार मोहन देशमुख तपास करीत आहेत.


























































