जिंतूर- करंजी पाटीजवळ दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू

749

परभणीतील जिंतूर-बामणी रस्त्यावर बुधवारी सकाळी 9.30 वाजता दोन दुचाकींची धकड झाली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. जिंतूर तालुक्यातील कोलपा येथील रवी पंजाबराव सातपुते (वय 25) आणि त्याचा मित्र बाबू सखाराम गिरी (रा.संक्राळा, ता.जिंतूर) हे दोघे दुचाकीने बामणीकडून कुऱ्हाडीकडे जात होते. त्याचवेळी अंबरवाडीकडून बामणीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या हिरो होंडा ही दुचाकीला त्यांची दुचाकी धडकली. या अपघातात रवि पंजाबराव सातपुते याचा मृत्यू झाला आहे. त्याला उपचारासाठी जिंतूर रुग्णालयात नेताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.

या अपघातातील हिरो होंडा दुचाकीवरील तिघेजण मिलिंद बबन उजागर (वय 32, रा.बोरी), सिद्धार्थ नामदेव अंभोरे (वय 25, रा.केलसुला, ता.सेनगाव) आणि विकास शिवाजी भुतेकर (वय 20, रा.केलसुला, ता. सेनगाव) यांच्यासह रवीसोबत असलेल्या बाबू सखाराम गिरी हे चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जिंतूर ट्रामा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेने कोलपा परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या