
उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालल्याने भरदुपारी भरधाव वेगात असलेल्या दुचाकीला अचानक आग लागल्याने दुचाकी जळून खाक झाली, तर दुचाकीस्वारांनी प्रसंगावधानता राखून उडी मारल्याने कुठलीही इजा झाली
नाही. ही घटना जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वडीगोद्री रस्त्यावर आज 5 मे रोजी दुपारी घडली.
अंबड तालुक्यातील गोंदी येथून वडीगोद्रीकडे टरबूज विकण्यासाठी जाणारे विलास बाबुराव पंचलोटे हे आपले वाहन क्र. (एम. एच. 21 – 9859) प्लॅटिना गाडीने जात असतांना वडीगोद्री शिवारात विकास पवार यांच्या शेताजवळ येताच
चालुमध्ये विलास पंचलोटे यांच्या गाडीने अचानक पेट घेतला. ही बाब विलासच्या लक्षात येताच त्यांनी उडी मारल्याने बालंबाल बचावले, मात्र गाडीने जास्तच पेट घेतल्याने स्फोट होऊन दुचाकी जळून खाक झाली.
गाडीने अचानक पेट घेतल्याक्षणी उडी मारल्यामुळे विलास पंचलोटे वाचले, सुदैवाने त्यांना कुठलीही जीवितहानी झाली नाही. गाडीने अचानक कशामुळे पेट घेतला याचे नेमके कारण समजू शकले नाही, मात्र विलास पंचलोटे यांच्या
सांगण्यावरून गाडी सकाळपासून उन्हामध्ये उभी होती व गाडीमध्ये 5 ते 6 लिटर पेट्रोल होते. उन्हामध्ये गाडी उभी असल्याने ही घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.



























































