एका पतीसाठी दोन पत्नींनी गाठले पोलीस स्थानक, तीन तीन दिवसांच्या वेळेवर झाली मांडवली

839

झारखंडमध्ये पोलिसांसमोर एक विचित्र घटना समोर आली आहे. एका व्यक्तीला दोन पत्नी होत्या. आपला पती वेळ देत नाही म्हणून दुसरी पत्नी थेट पोलीस स्थानकात पोहोचली. तेव्हा पोलिसांनी तिघांना समोर बोलवून दोघींना तीन तीन दिवसांचा वेळ द्यायचा यावर दोन पत्नींची मांडवली झाली.

झारखंडच्या रांचीमध्ये एक पत्नी पोलीस स्थानकात पोहोचली. तेव्हा आपला पती गेली ५ दिवस घरी आला नाही अशी तक्रार नोंदवली. तसेच तो पहिल्या पत्नीसोबत आहे अशी माहितीही तिने दिले. पोलिसांनी पतीला आणि दुसर्‍या पत्नीला बोलावून घेतले. पोलिसांनी तिघांमध्ये समेट घडवून पती दोघींना तीन तीन दिवस वेळ देईल यावर शिक्कामोर्तब झाले. तसेच एक दिवस तो आपले काम करेल असेही यावेळी ठरले.

आपली प्रतिक्रिया द्या