फळं, बीफ आणि चहा-कॉफीवरील टॅरिफ मागे घेतले; अमेरिकेकडून दिलासा

अमेरिकेचे ‘टॅरिफ’फेम अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना स्वदेशातील जनक्षोभापुढे माघार घ्यावी लागली आहे. ट्रम्प यांनी फळे, बीफ, चहा-कॉफीसह 200 खाद्यपदार्थांवरील टॅरिफ मागे घेतले आहे. त्यामुळे अनेक देशांना दिलासा मिळणार आहे. टॅरिफमुळे अमेरिकेत महागाई वाढली आहे. याचा फटका ट्रम्प यांच्या पक्षाला स्थानिक निवडणुकांमध्ये बसला. याची दखल घेत ट्रम्प सरकारने हा निर्णय घेतला.

हिंदुस्थानला फायदा नाही

ज्या वस्तूंवरील टॅरिफ हटविले आहे, त्या बहुतेक वस्तू मेक्सिको, ब्राझिल, कॅनडा, ग्वाटेमाला, इक्वाडोर या देशांतून येतात. हिंदुस्थानकडून अमेरिका या वस्तू घेत नाही. त्यामुळे हिंदुस्थानला फायदा होण्याची शक्यता नाही.