
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सुनिल शिंदे यांच्या संकल्पनेतून डिलाईल रोड येथील अमरप्रेम क्रीडा मंडळाच्या वतीने कबड्डीची पंढरी म्हणून ओळखले जाणारे तबेला मैदान-श्रमिक जिमखाना मैदानाच्या हिरक महोत्सवी सोहळ्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावली. महाराष्ट्राच्या मातीतल्या या कबड्डी खेळासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. यावेळी युवासेनाप्रमुख शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आमदार भास्कर जाधव, आमदार अजय चौधरी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या मुंबई महानगरपालिका विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, विभागप्रमुख आमदार महेश सावंत, मुंबईचे माजी महापौर महादेव देवळे, माजी हॉकीपटू धनराज पिल्ले तसेच दिग्गज कबड्डीपटू, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.





























































