स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागा, उद्धव ठाकरे यांचे पश्चिम विदर्भातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात ‘मातोश्री’ निवासस्थानी पश्चिम विदर्भातील पदाधिकाऱयांची आज बैठक घेतली. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकांसाठी जोमाने कामाला लागा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

निवडणुका संपूर्ण ताकदीनिशी लढायच्या आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, गट आणि गण स्तरावर आतापासूनच जोरदार तयारी सुरू करा. महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये पक्षाच्या वॉर्ड बैठका घेऊन संघटना बळकट करा, असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱयांना दिले. यामध्ये अमरावती जिल्हाप्रमुख पराग गुडधे, मनोज कडू, नरेंद्र पडोळे, सुधीर सूर्यवंशी, आमदार गजानन लवटे, उपजिल्हाप्रमुख प्रा. प्रफुल्ल भोजने, तालुकाप्रमुख प्रमोद धनोकार, शिवराज चौधरी आणि मयूर गव्हाणे यांचा समावेश होता.