Live – द्वेषाच्या काविळीवर उपचार नाही! विरोधकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सणसणीत टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  • बहिणाबाई चौधरींची कविता आहे.

मानूस मानूस मतलबी रे मानसा,

तुले फार हाव तुझी हाकाकेल आशा मानसा मानसा,

तुझी नियत बेकार तुझ्याहून बरं गोठ्यांतलं जनावर,

भरला डाडोर भूलीसनी जातो सूद खाईसनी चारा

गायम्हैस देते दूध मतलबासाठीं मान मानूस डोलये

इमानाच्यासाठीं कुत्रा शेंपूट हालये मानसा मानसा,

कधीं व्हशीन मानूस लोभासाठी झाला मानसाचा रे कानूस !

  • इंदिरा गांधींनी आणीबाणी घोषित केली होती, ही अघोषित आणीबाणी आहे
  • 2014 ला युती तोडली तेव्हाही मी हिंदू होतो, आजही आहे
  • मला विचारता की बाळासाहेबांना काय उत्तर देणार, बाळासाहेबांनी तुमच्या ज्या नेत्यांना वाचवलं ते तरी गेल्यानंतर बाळासाहेबांना काय उत्तर देणार ?
  • इतकाच तुमचा जीव जळत असेल तर मला टाका तुरुंगात
  • सत्तेसाठी पेन ड्राईव्ह गोळा करू नका, खप वाढल्याने गरज असते त्यांना पेन ड्राईव्ह मिळत नाही. मी तुमच्याबरोबर येतो, टाका मला तुरुंगात. आम्ही तुमच्या कुटुंबियांची बदनामी केली आहे का ?
  • मागे गडकरी म्हणाले होते की आमच्याकडे वाल्याचा वाल्मिकी होतो, तुमच्याकडे ह्युमन लॉड्रींगचं काम आहे का ?
  • मर्द असशील तर मर्दासारखा ये अंगावर मग मी आहे आणि तू आहेस
  • कुटुंबियांची बदनामी करणं हे अत्यंत नीच, निंदनीय आणि अत्यंत विकृत गोष्ट आहे
  • आम्ही इकडे सगळे बसलेलो भ्रष्टाचारी आहोत, आम्ही दाऊदची माणसे आहोत, पण खरं सांगा तुमचा सकाळचा सत्तेचा प्रयोग यशस्वी झाला असता तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुमच्या मांडीला मांडी लावून बसले असते की नाही ?
  • तुमच्याकडे असं कोणतं झोपेचं औषध आहे मला कळत नाही
  • हर्षवर्धन पाटील यांना झोप लागत नव्हती, मग त्यांनी झोपेचं औषध घेतलं. तिकडे जाऊन झोपायला लागले. हा अनुभव त्यांनी एका सभेत सांगितलाय.
  • लांबेंच्या नेमणुकीच्या पत्रावर सही तत्कालीन मंत्री विनोद तावडे यांनी हिरव्या शाईने केली आहे
  • माझे तुमच्यासोबत, मोदीजींबरोबर, अमित शहांसोबत फोटो आहे
  • मुदस्सर लांबे यांच्यासोबत तुमचे फोटो आहेत
  • मी कडवट हिंदुत्ववादी आहे आणि राहणार
  • कश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्तीसोबत तुम्ही बसला होता, मेहबूबांनी अफजल गुरुला फाशी देऊ नका असं म्हटलं होतं, अफजल गुरु हा देशद्रोही नव्हता का ?
  • जा घुसा, दाऊदच्या घरात घुसून मारा जसं ओबामाने ओसामाला मारलं
  • का नाही मारत दाऊदला, मुळंच उपटून टाका
  • ओबामाने ओसामाच्या नावाने मतं मागितली होती का ? त्याने निवडणुकीत त्याचा उल्लेख केला होता का ? ओबामाने कोणाची वाट न पाहाता जवान पाठवून लादेनला मारला, याला म्हणतात मर्दपणा
  • पूर्वी रामाच्या नावाने मतं मागायचात आता दाऊदच्या नावाने मतं मागणार आहात का ?
  • ईडी आहे का घरगडी ?
  • माहिती देणारे तुम्हीच, आरोप करणारे तुम्हीच, चौकशी करणारे पण तुम्हीच
  • देवेंद्रजी तुम्हाला केंद्राने रॉ, सीबीआयने घ्यायला पाहिजे म्हणजे काम आणकी वेगाने चालेल. कारण ती माहिती तुम्ही ईडीला दिली असं मी तुमचं वक्तव्य वाचलं
  • केंद्रातील यंत्रणा करतात काय ? थाळ्या वाजवा, दिवे लावा, दिवे विझवा हे करायचं का ?
  • केंद्रीय यंत्रणा इतक्या पोकळ झाल्यात का की, नवाब मलिक हे दाऊदचा हस्तक असतील आणि मुंबईत, देशात फिरत असतील, 4-5 वेळा निवडून येत असतील, तर केंद्रातील यंत्रणेला माहिती नाही ?
  • मी टीका आणि बदनामीला घाबरत नाही
  • कठीण काळात अर्थमंत्र्यांनी अप्रतिम अर्थसंकल्प मांडलाय
  • आरोप करा, पण त्याला काहीतरी आधार असूद्या
  • जे टेंडर उघडलं नाही, एक पैसा खर्च झाला नाही तर त्या पाकिटात भ्रष्टाचार झाला हे तुम्हाला कसं कळालं, त्यातला पेन ड्राईव्ह तुम्हाला कोणी दिला ?
  • कौतुक नका मरु, घरच्या म्हातारीचे काळ होण्याचं पाप करू नका
  • धारावी वाचवली याचं कौतुक कोणालाच नाही?
  • एल१ आलेल्यालाच टेंडर देण्यात आली, तरीही त्यांच्यामागे चौकशा
  • महापालिकेने एकही काम टेंडरशिवाय केलं नाही
  • जीव वाचवणं ही प्राथमिकता आहे, तेच काम महापालिकेने केलं
  • बुडणाऱ्याला वाचवण्यासाठी त्याच्यासाठी टायर पाण्यात फेकणार का टायरसाठी टेंडर काढणार ?
  • प्रामाणिकपणाने सांगतो कोविडशी लढताना पंतप्रधानांनी पक्षभेद विसरून सगळ्या राज्यांना सारखी मदत केली हे मी उघडपणे सांगतो, मी कद्रूपणा करणार नाही
  • पालक म्हणून केंद्र सरकारने निपक्ष भूमिका घ्यायला हवी मात्र केंद्र कोणाची बाजू घेतंय हे कामकाज पाहिल्यास लक्षात येईल
  • कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र विषय सोडवण्यासाठी केंद्र सरकार काही करत नाहीये
  • मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पाठपुरावा करत आहे
  • बॉम्ब उच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालय नाव व्हावे यासाठी पाठपुरावा करत आहे
  • मेट्रोच्या कामात 10269 कोटी वाढीचा प्रस्ताव देवेंद्रजी आपल्या काळातला आहे, हा आमच्या काळातला नाही. हा खर्च का वाढला याची एकनाथ शिंदेजी आपण चौकशी लावा
  • मेट्रोचं काम बंद पडू दिलं नसून ते आणखी वाढवत आहोत
  • एका ठिकाणी नदीत मृतदेह टाकण्यात आले, तसं आपण होऊ दिलं नाही. आपण जे करणं शक्य होतं ते केलं.
  • कोविडमधून लोकं बरी होतात, मात्र द्वेषाची कावीळ कोणाला झाली असेल तर त्याचा उपचार कोणत्याही दवाखान्यात होत नाही
  • निवडक दवाखान्यांमध्ये 139 चाचण्या मोफत किंवा नाममात्र दरात उपलब्ध करून देत आहोत
  • मुंबई महापालिका ही 8 भाषांतून शिक्षण देणारी ही जगातील एकमेव महापालिका आहे
  • महापालिकेच्या शाळात पाल्याला अॅडमिशन मिळावी यासाठी बाहेर रांग लागलेली असते ही जगातील एकमेव महापालिका असेल
  • माझ्या मुंबईत मी जे काही आम्ही करणार ते जगातली सर्वोत्तम असलंच पाहिजे हा माझा कटाक्ष असतो
  • मी पक्का मुंबईकर असून मला माझ्या मुंबईचा अभिमान आहे
  • रावणाचा जीव हा बेंबीत होता असं म्हणतात, तसा काही जणांना काहीही मिळालं तरी त्यांचा जीव हा बेंबीत नाही मुंबईत असतो
  • राज्यपाल राज्याचा विकास काय झाला हे सांगत असताना ते तुम्ही लोकांसमोर येऊ देत नाही , महाराष्ट्राला बदनाम करताय हे योग्य नाही
  • कर्नाटकमध्ये 7.10, मध्य प्रदेश 5.07, उत्तर प्रदेश 2.60, तमिळनाडू 9.43, तेलंगाणा 6.30 अशा प्रमाणात दुकाने आहेत
  • देशात 1 लाख लोकसंख्येमागे मद्यविक्रीची दुकाने महाराष्ट्रात सर्वात कमी आहेत
  • मध्य प्रदेशाला मद्य प्रदेश म्हणणार का ?
  • छत्रपतींच्या महाराष्ट्राला सुधीरभाऊ तुम्ही मद्यराष्ट्र म्हणालात
  • शस्त्रक्रियेच्या काळात आपण सगळ्यांनी आणि मंत्र्यांनी माझी उणीव भासू न देता उत्तम काम केलं.
  • काही जणांची सवय काय असते की आरसा बघितला तरी ते भ्रष्टाचार झाला म्हणतात
  • राज्यपाल राष्ट्रगीतालाही थांबू शकले नाही, इतका घोर अपमान क्वचितच कुठल्या विधानसभेत झाला असेल
  • तक्रारी आक्षेप राज्यपालांकडे नोंदवत असताना राज्यपाल प्रगतीचा आढावा मांडत असतात
  • दाऊद एके दाऊद विरोधकांनी केलं
  • राज्यपालांनी भाषण सुरू केल्यानंतर सुरू झालेला गोंधळ शोभणारा नव्हता
  • राज्याची एक संस्कृती, परंपरा आहे
  • काही प्रथा परंपरा आपण पाळल्या पाहिजेत
  • राज्यपाल हे एक संवैधानक पद आहे, त्यांचं महत्व हे आमच्यापेक्षा विरोधकांना जास्त माहिती आहे