आम्ही विकासाचे मारेकरी नाही, महाराष्ट्राचे प्रेमी आहोत! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना ठणकावले

1390
CM uddhav-thackeray

राज्यातील कोणत्याच विकासकामांना सरकारने स्थगिती दिलेली नाही, उलट विकासकामांना गती मिळाली आहे. महाराष्ट्राला देशातले प्रगत राज्य करायचे आहे. त्यामुळे आम्ही कोणतेही काम थांबवत नाही, तर विकासकामांना प्राधान्यक्रम देत आहोत. आम्ही विकासाचे मारेकरी नाही तर महाराष्ट्राचे प्रेमी आहोत अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी विरोधकांना ठणकावले.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपकडून विकासकामांना स्थगिती दिली गेल्याचा आरोप साफ फेटाळून लावला. सुधीर मुनगंटीवार यांनी नगरपालिकांना मिळणाऱया निधीला स्थगिती दिली असल्याचा आक्षेप घेत वेळ पडल्यास हक्कभंग आणू असा इशारा दिला. यावर तितक्याच नम्रपणे उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, सुधीरभाऊ हक्कभंग जरूर करा, पण पहिला हक्क समजून घ्या. कोणत्याही कामाला स्थगिती दिलेली नाही. प्राधान्यक्रम समजून घ्या. जे गैर वाटते त्याला स्थगिती दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मराठी बांधवांसाठी एकजूट दाखवा
कर्नाटकव्याप्त महाराष्ट्रात अजूनही मराठी बांधवांवर भाषेचा अत्याचार होतोय तो आम्ही सहन करणार नाही. कर्नाटकमध्ये राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येतात, त्याप्रमाणे आपण मराठी मातेचे पुत्र एकजुटीने त्या पुत्रांसाठी काम करूया, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. जसा सीएए कायद्याच्या माध्यमातून बाहेरच्या देशात अन्याय होणाऱया हिंदूंना आपण देशाचे नागरिकत्व देणार आहोत त्याप्रमाणेच कर्नाटकात असले तरी ते मराठी बांधव आहेत. त्यांच्यासाठी एकजुटीने प्रयत्न व्हायला हवा. त्यासाठी मंत्र्यांची समिती नेमली आहे असे सांगत कर्नाटक सरकारमधील मराठी भाषिकांवर कानडी गोष्टी लादल्या जात असतील तर हे अत्याचार थांबवले पाहिजेत. ते थांबले तरच आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देऊ शपू, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

मराठी रंगभूमीचे दालन उभारणार
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे अशी आपण मागणी करीत आहोत. तशीच समृद्ध रंगभूमी या महाराष्ट्राला लाभली आहे. ही रंगभूमी केवळ मनोरंजनासाठी नाही तर त्यातून समाजप्रबोधन घडले आहे. पुसुमाग्रजांचे नटसम्राट, राम गणेश गडकरींचा एकच प्याला ही नाटपं मनोरंजनासाठी नव्हती तर समाजातील वर्मावर बोट ठेवणारी होती. खाडिलकरांनीही नाटपं लिहिली. स्वातंत्र्यपूर्व काळात मरगळ आलेल्या समाजात नवचैतन्य निर्माण करणारी ही नाटपं होती. मराठी रंगभूमीचा हा समृद्ध इतिहास सांगणारं दालन, जिवंतपणाने ही नाटपं, कशी रंगभूमी मराठी समाजाला घडवत गेली याचा समृद्ध इतिहास जिवंतपणाने आपल्यासमोर मांडला गेला पाहिजे. त्यादृष्टीने सरकार प्रयत्न करेल. लवकरात लवकर सर्वांना अभिमान वाटेल असं हे दालन उभारलं जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

सरकार आदिवासींच्या पाठीशी
आदिवासी समाजातील वंचित घटकांना सरकारच्या आधाराची गरज आहे. स्वातंत्र्यलढय़ात आदिवासींचा सहभाग होता. अजूनही या आदिवासींकडे जमिनींबद्दल, मूलभूत गरजांबद्दल लक्ष दिलं गेलेलं नाही. आदिवासींना जातपडताळणी सर्टिफिकेट मिळवणं कठीण होतं. जर का सीएए, एनआरसी, एनपीआर माध्यमातून सर्टिफिकेट मागायला सुरुवात केली तर मग स्वातंत्र्य म्हणजे काय, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण होईल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. आदिवासींच्या नोकरी, आश्रमशाळा तसेच अन्य बाबींसाठी त्यांच्या पाठीशी हे सरकार ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मुख्यमंत्री कार्यालयाचा विस्तार
नागपूर अधिवेशनात शेतकऱयांना कर्जमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. आता कर्जमाफीला सुरुवात झाली असून शेतकऱयांची पहिली यादी जाहीर केली गेली. एका 85 वर्षांच्या वृद्धेला ती हॉस्पिटलमध्ये असताना तिच्या खात्यावर कर्जमुक्तीचे पैसे जमा झाले. हे एपूण आनंद झाला. गरीबांना मंत्रालयात वारंवार खेटे पडू नयेत यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाचे विस्तारीकरण सुरू केले असून त्यामध्ये आता विभागीय कार्यालये सुरू केली जात आहेत. लवकरच याचा विस्तार तालुका पातळीवर केला जाईल, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

जगाला हेवा वाटेल असा हीरक महोत्सव साजरा करू!
हे संयुक्त महाराष्ट्राचं हीरक महोत्सवी वर्ष आहे. ही मुंबई महाराष्ट्राला कोणी आंदण दिलेली नाही, तर मराठी माणसाने रक्त सांडून मिळवलेली आहे. त्या गोष्टीला 60 वर्षं होत आहेत. सत्ताधारी व विरोधकांचे विचार वेगवेगळे असतील, पण आपले राज्य एक आहे. तेव्हा जगाला हेवा वाटावा असा हीरक महोत्सव साजरा करू अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या