भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं अभिवादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंती निमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गुरुवारी सकाळी चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन केले.

याप्रसंगी राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, खासदार राहुल शेवाळे, जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर आणि मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री यांच्यासह मान्यवरांनी चैत्यभूमी परिसरात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागातर्फे उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासावर आधारित छायाचित्र प्रदर्शनीला देखील भेट दिली. त्यानंतर नव्याने उभारण्यात आलेल्या ‘माता रमाबाई आंबेडकर व्ह्यूईंग डेक’ला देखील सर्व मान्यवरांनी आवर्जून भेट दिली.