वीर सावरकरांच्या स्मृतीचित्राचे उद्धव ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण

629
uddhav-thackeray-thane


ठाणातील गडकरी रंगायतन येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतीचित्राचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक हे देखील उपस्थित होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे कायमच प्रेरणास्थान राहिले आहेत. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर सावरकरांची खिल्ली उडवल्या प्रकरणी जोरदार टीका केली होती. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना माफ करणार नाही असे देखील सुनावले होते.

आपली प्रतिक्रिया द्या