
राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी लिहिलेल्या ‘उद्धव ठाकरे-द टायगर’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवार, 29 जानेवारीला संध्याकाळी 5 वाजता शिवसेना नेते, उद्योग व मराठी भाषामंत्री सुभाष देसाई याच्या हस्ते होणार आहे. या पुस्तकात राजकारणापलीकडच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेचा वेध घेण्यात आला आहे. यात मुख्यमंत्र्यांच्या स्वभावाचे वेगळेपण डॉ. सावंत यांनी मांडले आहे. त्याचबरोबर डॉ. सावंत यांच्या ‘वाईल्ड लाईफ पह्टोग्राफी’ या पुस्तकाचे प्रकाशनसुद्धा होणार आहे. यावेळी छायाचित्रकार मोहन बने उपस्थित राहणार आहेत. या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन विलेपार्ले पूर्व येथील केशवराव घैसास सभागृहात होणार आहे.


























































